Tuesday, April 7, 2020

माझे विद्यापीठ - Poem by Narayan Surve

ना घर होते , ना गणगोत , चालेन तेवढी पायाखालची जमीनहोती
दुकानांचे आडोसे होते , मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.

अशादेण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊठबस करता करता....
टोपलीखाली माझ्यासह जग झाकीतदररोज अंधार येत जात होता.

मोजलेत सर्व खांब ह्या रस्त्यांचे , वाचलीपाट्यांवरची बाराखडी
व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेत ; हातचे राखून कित्येकमारलेले गडी.

हे जातीजातींतबाटलेले वाडे , वस्त्या , दारावरचे तांबडे नंबरीदिवे
सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचेथवे.

अशा तांबलेल्या , भाकरीसाठी करपलेल्या , उदास वांदेवाडीच्यावस्तीत
टांगे येत होते , घोडे लोळण घेत होते , उभा होतो नालीचा खोकासांभाळीत.

“ले , पकड रस्सी-हां-खेच , डरता है ? क्या बम्मनका बेटा है रे तूसाले
मजदूर है अपन ; पकड घोडे को ; हां ; यह , वाह रे मेरे छोटेनालवाले. ”

याकुब नालबंदवाला हसे , गडगडे. पत्रीवाला घोडा धूळ झटकीत उभाहोई
“अपनेको कालाकांडी. तेरेको जलेबी खा. ” म्हणत दुसरा अश्व लोळवलाजाई.

याकुब मेला दंग्यात , नव्हते नाते ; तरीही माझ्या डोळ्याचे पाणी खळलेनाही
उचलले नाही प्रेत तेव्हा ‘मिलाद-कलमा ’;च्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलोनाही.

त्याच दिवशी मनाच्या एका को-या पानावर लिहले , “हे नारायणा ”
अशानंग्याच्या दुनियेत चालायची वाट ; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा. ”

भेटला हरेकरंगात माणूस , पिता , मित्र , कधी नागवणारा होईन
रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावरघेतलेत पायाचे तळवे होरपळवून.

तरी का कोण जाणे ! माणसाइतका समर्थ सृजनात्मामला भेटलाच नाही
आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने ; वाटते , अजून काही पाहिलेचनाही ,

नाही सापडला खरा माणूस ; मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो ?
सदंतीसजिने चढून उतरताना , मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो ?

आयुष्य दिसायलापुस्तकाच्या कव्हरासारखे गोंडस , गुटगुटीत , बाळसेदार.
आतः खाटकाने हारीनेमांडावीत सोललेली धडे , असे ओळीवर टांगलेले उच्चार

जीवनाचा अर्थ दरेक सांगीतमिटवत जातो स्वतःला स्वतःच्याच कोशात
पेन्शनरासारख्या स्मृती उजाळीत उगीचचहिंडतो कधी वाळूत कधी रामबागेत

हे सगळे पाहून आजही वाटते , “हे नारायणा , आपणकसे हेलकावतच राहिलो. ’
चुकचुकतो कधी जीव ; वाटते , ह्या युगाच्या हातून नाहकचमारले गेलो.

थोडासा रक्ताला हुकूम करायचा होता , का आवरला म्यानावरचाहात ,
का नाही घेतले झोकवून स्वतःला , जसे झोकतो फायरमन फावडेइंजिनात.

विचार करतो गतगोष्टींचा , काजळी कुरतडीत जणू जळत राहावा दिवाएक
उध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधीत हिंडावा परतलेला सैनिक.

कितीवाचलेत चेहरे , किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात
इथे सत्य एक अनुभव , बाकी हजारग्रंथराज कोलमडून कोसळतात.

खूप सोयरीक करोत आता ग्रंथाची ; वाटते तेहीआपणासारखेच बाटगे निघाले
हवे होते थोडे परिचारिकेसम , कामगारासम निर्मितिक्षम. पणदुबळेच निघाले.

जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते ; भरताना तेही बापडेदडतील
स्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.

वाढलेम्हणतात पृथ्वीचे वय , संस्कृतीचेही ; फक्त वयेच वाढत गेली सर्वांची
छान झाले ; आम्हीही वाढतो आहोत नकाशावर. गफलत खपवीत जुळा-यांची.

ह्या कथाः कढ आलेल्याभाताने अलगद झाकण उचलावे तसा उचलतात
रात्रभर उबळणा-या अस्थम्यासारख्या अख्खा जीवहल्लक करुन सोडतात.

कळले नाहीः तेव्हा याकुब का मेला ? का मणामणाच्याखोड्यात आफ्रिकन कोंडला ?
का चंद्राच्या पुढ्यातला एकुलता पोर युध्दाच्यागिधाडाने अल्लद उचलला ?

चंद्रा नायकीण ; शेजारीण , केसांत कापसाचे पुंजके माळूनघराकडे परतणारी
पंखे काढलेल्या केसांवरुन कापसाखळीची सोनसरी झुलपावरुनझुलणारी

अनपड. रोजच विकत घेऊ पेपर , रोजच कंदिलाच्या उजेडात वाचायची सक्तीहोई
“खडे आसा रे माझो झील ; ह्या मेरेर का त्या रे ,” भक्तिभावाने विचारीतजाई.

कितीतरी नकाशांचे कपटे कापून ठेवले होते तिने , ; जगाचा भूगोल होताजवळ
भिरभिरायची स्टेशनांच्या फलाटावरुन , बराकीवरुन , मलाच कुशीत ओढीजवळ.

मेली ती ; अश्रूंचे दगड झालेत. चटके शांतवून कोडगे झाले आहे मन
बसतोत्यांच्या पायरीवर जाऊन , जसे ऊन. ऊठताना ऊठवत नाही नाती सोडून.

निळ्याछताखाली नांगरुन ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी
दुखत होत्या खलाशांच्या मालचढवून उतरुन पाठी

वरुन शिव्यांचा कचकोल उडे , “ सिव्वर , इंडियन , कालेकुत्ते. ”
हसता हसता रुंद होत गो-या मडमांच्या तोंडाचे खलबते

आफ्रिकी चाचाचिडे , थुंके , म्हणे ; “काम नही करेगा. ”
चिलमीवर काडी पटवीत मी विचारी , “चाचा , पेटकैसा भरेगा ?”

धुसफुसे तो , पोट-या ताठ होत , भराभरा भरी रेलच्या वाघिणी
एकदिवस काय झाले ; त्याच्या डोळयात पेटले विद्रोहाचे पाणी

टरकावले घामेजलेखमीस , त्याच्या क्रेनवर बावटा फडफडला
अडकवून तिथेच देह माझा गुरु पहिले वाक्यबोलला ,

“हमारा खून झिंदाबाद ! ” वाटले , चाचाने उलथलाच पृथ्वीगोलट
खळालल्यानसानसांत लाटास कानांनी झेलले उत्थानाचे बोल

अडकवून साखळदंडात सिंहसोजिरांनी बोटीवर चढवला
“बेटा! “ गदगदला कंठ. एक अश्रू खमीसावर तुटूनपडला.

कुठे असेल माझा गुरु , कोणत्या खंदकात , का ? बंडवाला बंदीशाळेत
अजूनआठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरुन फिरलेला हात

आता आलोच आहे जगात , वावरतो आहे ह्याउघड्यानागड्या वास्तवात
जगायलाच हवे ; आपलेसे करायलाच हवे ; कधी दोन घेत ; कधी दोनदेत

No comments:

Post a Comment